Home गडचिरोली भाजपाच्या अधिकृत उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचे नामांकन दाखल

भाजपाच्या अधिकृत उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचे नामांकन दाखल

44
Oplus_16908288

– भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिल्यानंतर आज, 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत आपले नामांकन दाखल केले. गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी योगिता पिपरे, प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), रिना चिचघरे हे तीन उमेदवार इच्छुक होते. मात्र भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देत प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.

पक्षाच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. नामांकन अर्ज दाखल करताना निंबोरकर यांच्यासोबत मोठा समर्थक वर्ग उपस्थित होता. त्यांच्या उमेदवारीमुळे गडचिरोली शहरातील राजकारणात नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा दिसून आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे इतर पक्षांमध्ये तगडी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला. नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाने पुढील निवडणूक जोरदारपणे लढवण्याचा निर्धार केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. प्रणोती सागर निंबोरकर यांनी नागरिकांच्या विकासकामांना प्राधान्य देत शाश्वत आणि गतिमान प्रशासन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाच्या उमेदवारी प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासोबत आमदार डॉ. मिलिंद नरोटे, निवडणूक प्रभारी आमदार बंटीभाऊ भांगडीया, गडचिरोली निवडणूक प्रमुख तथा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह त्यांचे पती सागर निंबोरकर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!