Home गडचिरोली काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन ; कविता पोरेड्डीवार यांचा नामांकन अर्ज दाखल

काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन ; कविता पोरेड्डीवार यांचा नामांकन अर्ज दाखल

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज, 17 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षातर्फे रॅली काढून भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमांमधून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह मोठ्या जल्लोषात व आपले नामांकन अर्ज दाखल केले.

येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि मोठ्या जनसमर्थनासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची मोठी ताकद दिसून आली.

काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद बघता आगामी निवडणुकीत या पक्षाकडे जनतेचा कल स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र या शक्तीप्रदर्शनातून दिसून आले. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजित कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा महासचिव पंकज गुड्डेवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!