Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रमुखपदी प्रशांत वाघरे

गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रमुखपदी प्रशांत वाघरे

41
Oplus_16908288

– आ. कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया जिल्हा निवडणूक प्रभारी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांची जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाली आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा प्रभारीपदी माजी खासदार डॉ. अशोक नेते
यांची निवड करण्यात आली आहे.

ही महत्त्वपूर्ण जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचे कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि जनतेच्या सक्रिय सहकार्याने भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकहाती सत्ता मिळवून देतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!