Home गडचिरोली मुरखळा (नवेगाव) येथील पाणी पुरवठा बंद

मुरखळा (नवेगाव) येथील पाणी पुरवठा बंद

129
Oplus_16908288

– पाण्यासाठी नागरिकांना करावा लागत आहे मोठा त्रास सहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत मुरखळा (नवेगाव) येथील पाणी पुरवठा 13 नोव्हेंबरपासून अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुरखळा (नवेगाव) येथील नळ पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्तीची निविदा मे. माँ. दुर्गा कन्स्ट्रक्शन या नावाने प्रो. प्रा. रितेश गडपल्लीवार यांना मिळालेला होता. मागील तीन वर्षांपासून पाणी पुरवठा वितरित करण्याची व दुरुस्तीची कामे सुरळीत सुरू होती. मात्र सन 2024 – 25 निविदेतील 15,48,000 रुपयांचे देयक अदा करण्यात आलेली नव्हते. सदर देयके ग्रामपंचायत प्रशासनाकडे बाकी आहेत. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 च्या निविदेतील 1 एप्रिल 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीचे देयक 15,21,000 रुपये सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून अदा करण्यात आलेले नाही.

सदर दोन्ही देयकाची एकूण रक्कम 30,69,000 स्थगित असल्यामुळे व ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार विनंती करून आणि पत्र व्यवहार करून सुद्धा आजपर्यंत देयक अदा करण्यात आले नसल्यामुळे देयकाची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत नळ पाणी पुरवठा योजना बेमुदत बंद ठेवण्यात आलेली असल्याचे मे. माँ. दुर्गा कन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. रितेश गडपल्लीवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

error: Content is protected !!