Home गडचिरोली गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

58
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्यातील १४७ नगरपरिषदा व २४७ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

या आरक्षण सोडतीत गडचिरोली नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीने निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागलेले इच्छुक पुरुष उमेदवार यांचा मात्र काहीसा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे.

नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत सोमवारी पार पडली. यात विविध प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व महिला राखीव आरक्षण निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

error: Content is protected !!