Home गडचिरोली ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करून यशोशिखर गाठावे : अरविंदभाऊ कात्रटवार

ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करून यशोशिखर गाठावे : अरविंदभाऊ कात्रटवार

67
Oplus_16908288

– नवयुवक शारदा उत्सव मंडळ आंबेशिवणी टोलीच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन

– 60 विद्यार्थ्यांनी दिली सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रामीण भागातील विद्यार्थी हा आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास शिक्षण, क्रीडासह अन्य विविध क्षेत्रात आपला नावलौकीक प्राप्त करता येते हे जिल्हयातील अनेक युवक – युवतींनी आपल्या परीश्रमाच्या बळावर दाखवून दिले आहे. आंबेशिवणी टोली (ता. गडचिरोली) येथील नवयुवक शारदा उत्सव मंडळाने इयत्ता 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा आयोजीत करून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्याचा शैक्षणिक उपक्रम राबविला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणारा आहे. विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्पर्धा परीक्षेमध्ये रूची निर्माण करून भविष्यात यशोशिखर गाठावे आणि आपल्या गावाचा व जिल्हयाचा नावलौकीक वाढवावा, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पर्धेंच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

कार्यक्रमाला यादवजी लोहबरे, स्वप्नील झुमणाके, शारदा उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष पेंदाम, उपाध्यक्ष अजय राऊत, सदस्य विश्वास मारभते, श्लोक मंगर, अनिकेत चापले, साईनाथ ठाकरे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सागर आत्राम, शिक्षक गौतम फुडके, प्रशांत पेंदाम, अमित चौधरी, गुणेश गुणटीवार, संदीप चापले, सुजीन चौधरी, श्यामसुंदर कावळे, खुशाल कोरेते, विकास मारभते, ठुमदेव पाल, रोशन कोरेते, यशवंत पेंदोरकर, राकेश झंझाळ, सचिन मेश्राम, मनसुक चंद्रगिरे, संदेश सुर्यवंशी, अजिंक्य झंझाळ, शुभम मारभते, चेतन लोणारे, रोहीत धानफोले, सचिन चौधरी, महेश मारभते, कुणाल धुर्वे, साहिल कोरेते आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!