Home गडचिरोली प्राचार्य समशेर खान पठाण यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान

प्राचार्य समशेर खान पठाण यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान

52
Oplus_16908288

– शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांचे गौरवोद्गार

– शिवसैनिकांच्या वतीने प्राचार्य समशेर खान पठाण यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिक्षणाला सर्वस्व माणून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा आणि तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे आले पाहिजेत यासाठी उच्चविभूशीत प्राचार्य समशेर खान पठाण यांनी शिक्षणाची गंगा घराघरात पोहचवली. एवढेच नव्हे तर सामाजिक कार्यात सुध्दा त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदान प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार शिवसेना (उध्दव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी काढले.

अबुझमाड शिक्षण संस्था गडचिरोलीचे सचिव तथा भगवंतराव हायस्कूल गडचिरोलीचे प्राचार्य समशेरखान पठाण वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने शहरातील धानोरा मार्गावरील महाराजा हॉलमध्ये सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने शिवसैनिकांच्या उपस्थितीत पठाण यांचा त्यांच्या अर्धांगीणी प्राचार्य लिनाताई हकीम समवेत सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते.

अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, शिक्षण संस्था केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणापुरत्या मर्यादीत न राहता शाळा, महाविद्यालयातून गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाऊन शाळा व जिल्हयाचा नावालौकीक वाढविला पाहिजे यासाठी प्राचार्य समशेर खान पठाण यांनी अबुझमाड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासावर अधिक भर दिला. त्यामुळे त्यांच्या संस्थेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून यशोशिखर गाठले आहे. यासाठी प्राचार्य पठाण यांचे उत्तम शैक्षणिक व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभले. प्राचार्य समशेर खान पठाण यांनी शिक्षणाला सर्वस्व माणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दिलेले योगदान बहुमुल्य आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटावार म्हणाले.

सेवानिवृत्तीनंतर सुध्दा पठाण यांच्या हातून चांगले कार्य घडत राहील, असा आशावाद सुध्दा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त करीत प्राचार्य समशेर खान पठाण यांना पुढील जीवन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य मा. समशेर खान पठाण यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. तर त्यांच्या अर्धांगीणी प्राचार्य लिनाताई हकीम यांनी पठाण सरांचे मिळालेले पाठबळ व योग्य ते मार्गदर्शन हे आपल्या यशाचे गमक असल्याचे म्हटले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदिप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समिर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दिपक राऊत, अजित आजबले, त्रिशुल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनिल कोसमशिले, तुषार म्हशाखेत्री, विलास ढोलणे, स्वप्निल मांडोलकर, राहुल सावरकर, विनोद पातळ, पुरुषोत्तम डोईजड, प्रणय सोरते, राजु भैसारे, पंकज राऊत, तुषार ठाकरे, साहिल निकुरे, आशिष मुरतेली, समिर पिंपळे, साहिल बारापात्रे, प्रभाकर मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रणय बोरकर, लोकेश ठाकरे, संकेत बोरकर, सचिन मंगर, साहिल बांबोळे, हिमांशु चौधरी, सुमित डोंगरे, अनिकेत मेश्राम, प्रफुल बांबोळे, कुणाल म्हस्के, अजिंक्य नगराळे, रवि आवारी, तुषार म्हशाखेत्री, रोहित कुसनाके, शुभम पदा, मोहित कोसरे, नविन आवारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!