विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सोडे बिटस्तरीय क्रिडा सम्मेलन दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली व्दारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी येथे २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२५ दरम्यान होत आहेत. या बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा २३ सप्टेंबर २०२५ रोजी थाटात पार पडला.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष देवाजी नरुले होते. उद्घाटक म्हणून मुरमाडीचे सरपंच भोगेश्वरजी कोडाप उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीचे सदस्य डाॅ. सुरेश लडके उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी संंतोष कन्नाके, क्रीडा समन्वयक सतीश पवार, मुख्याध्यापक डोंगरे, मुख्याध्यापक कऱ्हाडे, मुरमाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष अशोकजी भुसारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विनायक भोयर, सेवानिवृत्त पदविका शिक्षिका निर्मला हजारे, सेवानिवृत्त शिक्षक घनशाम परशुरामकर, माध्यमिक मुख्याध्यापक हेमंत चुधरी, प्राथमिक मुख्याध्यापक देविदास लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या तिन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत एकूण १० शाळांमधील ७०० खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात वीर शहीद बिरसा मुंडा व शिक्षणमहर्षी श्रध्देय गो. ना. मुनघाटे, दंडकारण्यच्या मातोश्री कमलताई मुनघाटे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर अतिथींच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. या क्रीडा स्पर्धेत अनुदानित शाळा, मुरमाडी, जपतलाई, आरमोरी, परसवाडी तर शासकीय आश्रमशाळा सोडे, रांगी, भाकरोंडी, मुरुमगाव, सावरगाव, कुरंडीमाल या शाळांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन अजय नरुले यांनी केले तर आभार महेश बोरेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेताजी गावड, सुधीर म्हशाखेत्री, अजय वाकडे, शिक्षिका धुर्वे, शिक्षिका पेदापल्ली, शिक्षिका कुलसंगे, शिक्षक खंडाते, शिक्षक चापले, शिक्षिका बिसेन, शिक्षक अनिल सहारे, शिक्षक रुकमोडे, शिक्षक मेश्राम, शिक्षक दरवडे, शिक्षक कुमरे, शिक्षिका वंजारी, शिक्षक बखर, शिक्षक हर्षे, शिक्षक वसीम पठाण, शिक्षक कोरचा, शिक्षक घोडाम, शिक्षिका नाकतोडे, चंद्रकांत कोहपरे, नरेंद्र भोयर, रंजुताई उंदिरवाडे, सपना ठाकरे, देवानंद जांभुळकर, प्रदिप वाढणकर, संदिप बोधलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





