– शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांचे मस्कऱ्या गणरायाला साकडे
– मौशिखांब – मुरमाड़ी जि. प. क्षेत्रातील मस्कऱ्या गणपतीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत घेतले दर्शन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत मस्कऱ्या गणेशोत्सवाच्या पर्वात गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सार्वजनिक मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळाला भेटी देऊन मस्कऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवरील संकटे नाहीशी होऊन त्यांना सुखसमृध्दी लाभावी, यासाठी मस्कऱ्या गणपती बाप्पाला साकडे घातले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांना अधिक बळ प्राप्त होऊन त्यांना दुर्जनांचा सामना करण्याची प्रचंड शक्ती दे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अधिक उभारी दे, अशी मनोकामना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी विघ्नहर्त्या मस्कऱ्या गणपती बाप्पांकडे केली.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यांच्या सह मस्कऱ्या गणेश मंडळाचे सदस्य व गावकारी उपस्थित होते.





