Home गडचिरोली जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीचे धावपट्टू सहभागी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीचे धावपट्टू सहभागी

82

– अ. भा. आदिवासी विकास परिषदचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची घेतली भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदेच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मॅरेथॉन स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीचे धावपट्टू सहभागी होण्यासाठी विश्रामगृह गांधी चौक येथे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट घेतली. सहभागी शेकडो युवक, युवतींची निवास व जेवणाची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल सहभागी युवकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.

यावेळी आंतरराष्ट्रीय धावपट्टू नागराज खुरसने, गौरव खोडतकर, सौरभ बांते, पंकज उईके, मिताली भोयर तसेच अन्य सहभागी स्पर्धक यांच्यासह देवेंद्र राणे, उमेश उईके उपस्थित होते.

error: Content is protected !!