Home गडचिरोली भाजपा शहर गडचिरोलीतर्फे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शहरात विविध...

भाजपा शहर गडचिरोलीतर्फे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

140
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवाडा’ कार्यक्रमाअंतर्गत उद्या, 30 जुलै रोजी गडचिरोली शहरात विविध सामाजिक कार्यकम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी 10 वाजता अपंग विद्यालय लांजेडा येथे अन्नदान,  सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण, 11:30 वाजता श्री संत जगनाडे महाराज प्राथमिक शाळा लांजेडा येथे शालेय साहित्य वाटप, दुपारी 12 वाजता महिला रुग्णालय येथे ‘माणुसकीचा घास’ या कार्यक्रमांतर्गत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमांना सर्व जेष्ठ व शहरातील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहन भाजपा गडचिरोली शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!