Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

76

– तत्काळ निराकरण व पाठपुरावा करण्याच्या सूचना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज चामोर्शी येथील कर्तव्य कक्ष २ मध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडले. आमदार डॉ. नरोटे यांनी प्रत्येक समस्येचे गांभीर्याने ऐकून घेतले आणि त्यापैकी अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश दिले. ज्या समस्यांना अधिक वेळ किंवा प्रशासकीय कार्यवाहीची आवश्यकता होती, त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित समन्वय साधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रितेशजी पालारपवार, भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा महामंत्री रेवनाथजी कुसराम, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, नरेशजी अलसावार, नीरज रामानुजनवर, आणि इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!