Home गडचिरोली जि. प. उच्च प्राथमिक शाळा विकासपल्ली येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

जि. प. उच्च प्राथमिक शाळा विकासपल्ली येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

170
Oplus_16908288

– बँड पथकाद्वारे गावातून काढली प्रभातफेरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा विकासपल्ली येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत गावातून बँड पथकाद्वारे प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेत पुष्पगुच्छ देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिडीचा खेळ उपक्रम व विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल कागदावर घेऊन वर्गात प्रवेश देण्यात आले.

‘एक पेड माॅ के नाम’ हा उपक्रम घेण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला विकासपल्ली ग्रामपंचायत सरपंच श्यामल सिकदर, शा. व्य. स. अध्यक्ष विद्युत हलदर, रेगडी केंद्राचे केंद्रप्रमुख बी. एस. दुधबळे, उपसरपंच मिहीर बिस्वास, शा. व्य. स. उपाध्यक्ष ललिता महालदार, सदस्या शिप्रा बिस्वास, सदस्या संगिता किर्तुनिया, सदस्य अमिर बैरागी, अमित शाह, परितोष हालदार, उच्चश्रेणी मुख्याध्यापक दामोधर बामनवाडे, शिक्षक शिवाजी केंद्रे, शिक्षक जयंत समद्दार, शिक्षक जितेंद्र मंडल, शिक्षक मिस्त्री, शिक्षक आराधन मंडल, तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना गोड स्वादिष्ट भोजन देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!