Home गडचिरोली जागतिक योग दिनानिमित्त आरमोरी येथे आयोजित योग शिबिरात मा. आमदार कृष्णा गजबे...

जागतिक योग दिनानिमित्त आरमोरी येथे आयोजित योग शिबिरात मा. आमदार कृष्णा गजबे यांचा सहभाग

82

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी तालुका क्रीडा संकुल समिती द्वारा आयोजित पतंजली योग परिवार यांच्या वतीने “आंतरराष्ट्रीय योग दिनाचे” आयोजन आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलचे प्रांगणात सकाळी 6 वाजता करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांसमवेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थिती दर्शवित योगाभ्यास केला आणि उपस्थित सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. योग ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी असून मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपले शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे.

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी योगाचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन संपूर्ण जगाला योगासाठी एकत्र आणले, आणि आज संपूर्ण विश्व योगदिन साजरा करत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याप्रसंगी योग अभ्यास प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!