Home गडचिरोली भाजपाच्या वतीने कॅम्प एरिया गडचिरोली येथे योगसत्राचे आयोजन

भाजपाच्या वतीने कॅम्प एरिया गडचिरोली येथे योगसत्राचे आयोजन

84

– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त “करो योग – रहो निरोग” या प्रेरणादायी संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने हनुमान मंदिर परिसर कॅम्प एरिया गडचिरोली येथे भव्य योगसत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः सहभागी होऊन योगाभ्यास केला व नागरिकांना योगप्रेमी होण्याचे आवाहन केले.

या योग दिन कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉ. नितिन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, वर्षा शेडमाके, अल्का पोहनकर, सिमा कन्नमवार,अर्चना चन्नावार, सचिन तंगडपल्लीवार, अविनाश महाजन, विनोद देवोजवार, श्याम वाढई, मधुकर भांडेकर, हर्षल गेडाम, गुड्ड सरदार, प्रा.उराडे, नरेश हजारे, राजु शेरकी, केशव निंबोड यांच्यासह योग दिनाला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी योग सत्रात उपस्थित राहुन योग करत मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “योग म्हणजे आपल्या शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित संगम. हे केवळ व्यायाम नव्हे, तर आरोग्यसंपन्न, तणावमुक्त आणि समाधानी जीवन जगण्याचा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत योग अत्यंत आवश्यक ठरत आहे.” सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देत दररोजच्या जीवनात योगासना, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार करण्याचे आवाहन यावेळी मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि योग विषयक जनजागृतीचे दिलेले महत्त्वपूर्ण संदेश. संपूर्ण वातावरण योगमय झाले होते.

error: Content is protected !!