– शिवराजपूर येथे इमारत बांधकाम कामगार मेळावा संपन्न
– मोदींच्या सुशासनाचे 11 वर्ष संकल्पपूर्तीनिमित्त आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शनिवार, २१ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत सभागृहामध्ये कुरुड – कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका देसाईगंज ग्रामीणच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन माजी आमदार कृष्णाजी गजबे यांचा हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रोशनीताई पारधी ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सिंचाईचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माणिक बनसोड, शिवराजपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच वासुदेवजी झिलपे, कल्पतरू असंघटित कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष अंबादे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी लोककल्याणकारी सरकारच्या बहुजन कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रोशनीताई पारधी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या पाठीशी उभे आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील गावातील दीडशे ते दोनशे इमारत बांधकाम कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक तालुका अध्यक्ष सुनील पारधी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी झिल्पे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आदित्य मिसार, विकास पारधी, सुनील राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य मंजुषाताई मेश्राम, शाळा समिती शिवराजपूरचे अध्यक्ष प्रमोद बेद्रे, भूमेश्वर पारधी कोंढाळा यांनी परिश्रम घेतले.







