Home गडचिरोली जमीन हक्क परिषद तात्पुरती स्थगित

जमीन हक्क परिषद तात्पुरती स्थगित

95

– पुढील तारीख लवकरच जाहीर करणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी लाखो एकर खासगी जमिनींचे भूसंपादन येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. आधीच राज्यातील सर्वात कमी शेतजमिनीचे क्षेत्र असलेल्याने सदरचे भूसंपादन बळजबरीने केले गेले तर जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त झाल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी वाचविण्याच्या दृष्टीने दिशा ठरविण्यासाठी १८ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जमीन हक्क परिषद भरविण्यात येणार होती. मात्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमाव बंदी कलम लागू केल्याने व हवामान विभागाने येते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर खुल्या जागेत आयोजित केलेली ही जमीन हक्क परिषद पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, आयोजक रमेश चौखुंडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!