Home गडचिरोली गडचिरोली प्रकल्पतील ११ शासकीय आश्रमशाळांचा निकाल ९० टक्केच्या वर

गडचिरोली प्रकल्पतील ११ शासकीय आश्रमशाळांचा निकाल ९० टक्केच्या वर

88

– सरासरी ८४.७४ टक्के निकाल : अंगारा आश्रमशाळेची सानिया ताराम ७९ टक्के गुण घेऊन प्रथम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांनी कॉपीमुक्त वातावरणातही यंदा दहावीचा उत्कृष्ट निकाल दिला. गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रम शाळांपैकी ११ शासकीय आश्रम शाळांचा निकाल ९० टक्केच्या वर असून ७ शासकीय आश्रमशाळांचा निकाल ८० टक्के ते ९० टक्केच्या दरम्यान आहे. गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांचा सरासरी निकाल ८४.७४ टक्के लागलेला आहे. गडचिरोली प्रकल्पातील अंगारा शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी सानिया पतीराम ताराम हिने ७९ टक्के गुण घेऊन प्रकल्पात प्रथम क्रमांक पटकाविला.

मार्कंडादेव शासकीय आश्रमशाळेचा विद्यार्थी समीर राजकुमार गेडाम ७८.४० टक्के गुण घेऊन प्रकल्पात दुसरा क्रमांक पटकाविला. गडचिरोली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेची विद्यार्थिनी वैष्णवी रंजीत मडावी हिने ७८.२० टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला. सर्वात जास्त ९५.७४ टक्के निकाल रामगड शासकीय आश्रमशाळेचा लागला. दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचा निकाल ९५.५६ टक्के लागला आहे. कुरंडीमाल (९४.२९), भाडभिडी (९३.६२), मार्कंडादेव (९३.१८), येंगलखेडा (९२.५९), कारवाफा (९२.००), सावरगाव (९१.६७), गोडलवाही (९१.३०), पोटेगाव (९०.२४) व कोरची (९०.२४) या शासकीय आश्रमशाळांचा निकाल ९० टक्केच्या वर लागला. सर्वात कमी निकाल ३३.३३ टक्के ग्यारापत्ती शासकीय आश्रमशाळेचा आहे. ही शाळा वगळता गडचिरोली प्रकल्पातील इतर शासकीय आश्रम शाळांचा निकाल चांगला लागलेला आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!