Home गडचिरोली वसंत विद्यालयाचा विद्यार्थी आयुश ब्राम्हणवाडे याला ९७.६० टक्के गुण प्राप्त

वसंत विद्यालयाचा विद्यार्थी आयुश ब्राम्हणवाडे याला ९७.६० टक्के गुण प्राप्त

77

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक वसंत विद्यालय गडचिरोलीचा निकाल ८३. ७८ % लागला असून या शाळेचा विद्यार्थी आयुश सचिन ब्राम्हणवाडे ९७.६० % गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे. द्वितीय योगेश्वरी क्षीरसागर ९३. ६० %, तृतीय वेदांत भंडारे ९३. ४० % प्राप्त केले आहे.

चांदा शिक्षण मंडळ चंद्रपूर संचालित वसंत विद्यालय गडचिरोलीचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेतील ९० % पेक्षा जास्त गुण घेत ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणीत प्रावीन्य प्राप्त केले आहे. द्वितीय श्रेणीत ७५ % गुण घेणारे १७ विद्यार्थी असून एकूण १११ पैकी ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

या विद्यार्थ्यांना चांदा शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अशोकसिंह ठाकूर, उपाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, सचिव अशोकराव पुल्लावार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुचिता देवानंद कामडी यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.

error: Content is protected !!