Home गडचिरोली भाजपा गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक

भाजपा गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, दि. २० : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पक्षबांधणीच्या दृष्टीने व बुथ रचना, संघटन व सदस्य नोंदणी याविषयी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे होते. बैठकीला माजी खासदार तथा आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, वर्षा कन्नाके, विवेक बैस, नरेश हजारे, विजय उराडे उपस्थित होते.

या बैठकीत सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना प्रक्रियेला गती देण्यासाठी रणनीती आखण्यात आली. भाजपाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्व स्तरांवर अधिक प्रभावी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीला भाजपचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!