– विश्वविख्याता गायक सोनु निगम यांच्या गायनाच्या कार्यक्रमालाही डॉ. होळी यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
*गडचिरोली : लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित गडचिरोली प्रीमियर लीग (जीडीपीएल) २०२५ च्या अंतिम सामन्यात गडचिरोली हेरिकेन्स संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर गडचिरोली वॉरियर्स पोलीस संघ उपविजेता ठरला. बक्षीस वितरण सोहळ्यात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. श्री. आशिषजी जयस्वाल, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, माजी खा. डॉ. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, लाँयङ्स अँड मेटल्सचे व्यंकटेशजी, पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, माजी आमदार दिपकदादा आत्राम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राकेशजी बेलसरे, तसेच मोठ्या संख्येने लाँयङ्स मेटल्सचे पदाधिकारी व खेळाडू तसेच प्रेक्षक उपस्थित होते







