Home गडचिरोली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती

71
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत नियुक्तीचे पत्र संध्या उद्वव सोनवणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना पाठवले आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी पक्षाला सहकार्य राहील, असा विस्वास व्यक्त केला आहे. सदर नियुक्ती बद्दल गडचिरोली जिल्ह्यातील समस्त राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तनुश्रीताई यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!