Home गडचिरोली अ. भा. आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले व जयपालसिंग...

अ. भा. आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांची जयंती साजरी

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोली येथे स्वर्गीय लहुजी मडावी दलितमित्र सभागृहात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम 5 जानेवारी रोजी पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कोषाध्यक्षा श्रीमती सरोजताई मडावी तर अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई शेडमाके उपस्थित होत्या. कार्याध्यक्ष म्हणून राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीच्या प्राचार्या श्रीमती वैशाली प्रवीण मडावी तर विशेष अतिथी म्हणून श्रीमती मालतीताई सेमले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा महिला आघाडीच्या महासचिव विद्याताई मडावी, लेखिका व कवयित्री श्रीमती प्रतिक्षा कुळमेथे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी आदिवासी भगिनी तसेच राणी दुर्गावती कन्या वस्तीगृहातील विद्यार्थिनी सायली चांदेकर हिने सुंदर असे स्वागत गित गायन केले. तसेच दिक्षा कारेते या मुलीने ‘मी सावित्री बोलते’ हे एकपात्री नाटक सादर केले.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्याध्यक्षा श्रीमती वैशाली मडावी यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून संघटनेच्या कार्याचा उजाडा देत संघटनेचे महत्त्व विषद केले. तसेच समाजाला एकत्रित आणण्याकरिता अश्या कार्याक्रमाची गरज आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. विद्याताई मडावी यांनी याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी विशेष अतिथी मालतीताई सेमले यांनी जयपालसिंह मुंडा यांच्या जीवनकार्याचा आढावा देत आपली स्वरचित कविता याप्रसंगी सादर केली. श्रीमती प्रतिक्षाताई कुळमेथे यांनी आदिवासी हे निसर्ग पूजक आहेच. तसेच आपली संस्कृती ही महान संस्कृती आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

श्रीमती वर्षाताई शेडमाके यांनी याप्रसंगी असे कार्यक्रम घडविण्याकरिता समाजाला एकत्रित येण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती अन्नपूर्णा मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती यामिना मडावी हिने मानले.

error: Content is protected !!