Home गडचिरोली पहिल्या शिक्षिका व समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले : योगिताताई पिपरे

पहिल्या शिक्षिका व समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले : योगिताताई पिपरे

121
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा महिला मोर्चा गडचिरोली शहर यांच्या वतीने शुक्रवार, 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्तीदिन विश्राम भवन इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे साजरी करण्यात आली. यावेळी जुन्या कार्यकर्त्या महिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपा जिल्हा महामंत्री तथा न. प. गडचिरोली माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रात (नायगाव – सातारा) येथे झाला. त्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होत्या. त्यांना एकूण तीन भावंडे होती. त्या माळी समाजाच्या होत्या. त्यावेळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे नऊ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. सावित्रीबाईंना लिहिता-वाचता येत नव्हते. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या घरी शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात असमानता, पितृसत्ता आणि सामाजिक दडपशाहीशी लढण्यासाठी काम केले.

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या. हळूहळू संख्या वाढून २५ झाल्या व सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून मुलींचे अनेक शाळा सुरु झाल्या. त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्रासारख्या ग्रंथांऐवजी गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासांचा समावेश करण्यात आला व आज अनेक महिला शिकून डॉक्टर, वकील, पायलट, अधिकारी झाल्या असून अनेक महिला राजकारनात सुद्धा काम करीत आहेत.

सावित्रीबाई फुले या मराठी कवयित्री, समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या. त्यांनी व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, माजी. आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक प्रमोदजी पिपरे, भाजपा जेष्ठ नेते, रमेशजी भुरसे, माजी सभापती रंजनाताई कोडापे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, मुनेश्वर बोरकर, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर, महिला तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी नगरसेवक केशवजी निंबोळ, वैष्णवी नैताम, शहर महामंत्री विवेक बैस, पल्लवी बारापात्रे, अर्चना चन्नावार, अर्चना निंबोळ, रशमी बानमारे, देवाजी लाटकर, प्रा. अरुण उराडे, बेबीताई चिचघरे, पुनम हेमके, रुमनताई ठाकरे, कोमल बारसागडे, नीताताई बैस, नेवारे व सर्व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!