– भिक्षीमाल येथील जयंती कार्यक्रम व सभागृहाचे भूमिपूजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा भिक्षीमाल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी पूर्णवेळ उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सभागृहाचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी सरपंच अंजुताई मोटघरे, जयराम चलाख, सुरेश शहा, संतोष नर्मलवार, वासेकर, सविताताई वाळके, अनिता ठाकूर, भारत ठाकूर तसेच ग्रामवासीय उपस्थित होते.







