व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेन्द्र जोगड

56

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदासाठी 2024-25 ची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने नुकतीच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरच्या सभागृहात पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदासाठी लोकतंत्र की आवाज वृत्तपत्राचे संपादक जितेन्द्र (राजू) जोगड़ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विदर्भ विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर व वर्धा जिलाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी जितेन्द्र (राजू) जोगड़ यांची बिनविरोध निवड केली आहे.

या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, प्रदेश उपाध्यक्ष संजय पडोले, अनिल बालसराफ, जितेन्द्र चोरड़िया, गुरू गुरुनुले, अनिल पाटील, श्रीहरी सातपुते, आशीष रैंच, दीपक शर्मा, धनराजसिंह शेखावत, भोजराज गोवर्धन, रमेश महूरपवार, शंकर महाकाली, चेतन लुतडे, राजेश रेवते, सारथी ठाकुर व चंद्रपूर जिल्हा साप्ताहिक विंगचे अरुण वासलवार, सुरेश डांगे, गणेश रहीकवार, मनोहर दोतपल्ली, नरेश निकूरे, विठ्ठल आवले, विनोद बोदेले, रामकुमार चिचपाले, सुयोग डांगे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.