पालेबारसा येथील नाटकाचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते उद्घाटन

44
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : पालेबारसा (ता. सावली जि.चंद्रपूर) येथे साई गणेश नवयुवक नाट्य कला मंडळ पालेबारसा द्वारा आयोजित “हिजडा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनाप्रसंगी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच सर्व जनतेला दिवाळी व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता रोशनीताई वडेट्टीवार, माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनुरवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली नितीन पाटील गोहने, तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सावली उषाताई भोयर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती निखिल सुरमवार, माजी तालुकाध्यक्ष राजूभाऊ सिद्धम, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खुशाल लोंढे, राकेश चौधरी, प्रमोद दाजगाये, मिथुन ब्राह्मणवाडे, मंदाताई मडावी, प्राचार्य लोखंडे, श्रीकांत संगीडवार, पंकज कांगीलवार, मोहनजी मेश्राम, युवराज शेरकी, प्रशांत मलोडे, वैभव गुंजनवार, डंबाजी चौधरी, डॉ. मोरे, आकाश येनप्रेडीवार पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.