विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील तळोधी, हिवरगाव, आमगाव या गावांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पाटील पोरेटी यांच्या प्रचार दौरा कार्यक्रमात गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान व उमेदवार मनोहर पाटील पोरेटी यांनी गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होते.





