युवकांनी देशहितासाठी समोर यावे : खासदार अशोक नेते

99

– भारतीय जनता पार्टी सालेकसातर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा

– अनेक युवकांचा भाजपात पक्षप्रवेश

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अंतर्गत जिल्हा परिषद क्षेत्र कारुटोला, पंचायत समीती क्षेत्र लोहारा अंतर्गत भव्य कार्यकर्ता मेळावा भव्य क्रिकेट ग्राऊंंड शिवारीटोला (पांढरवाणी) ‘च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खासदार अशोक नेते यांनी युवकांनी देशहितासाठी समोर यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया, भैरसिंगभाऊ नागापुरे माजी आमदार आमगाव-देवरी वि.स क्षेत्र, संजयभाऊ पुराम माजी आमदार तथा सचिव महाराष्ट्र प्रदेश, विरेंद्रजी अंजनकर संपर्क प्रमुख, शंकरलालजी मडावी उपाध्यक्ष आदिवासी आघाडी, श्रावणजी राणा माजी सभापती जि. प. गोंदिया, अजयजी वरिष्ठ भाजपा नेते तर प्रमुख अतिथी म्हणून शेरसींगभैय्या नागपूर, गुणवंतजी बिसेन, शंकरलाल मडावी, प्रतिभाताई परिहर, परसुरामजी फुंडे, हुकरे, आर. डी. रहांगडाले, लक्ष्मण चुटे, श्रावणजी राणा, यादवजी नागपुरे, आदित्य शर्मा, सुनिलजी अग्रवाल, मेदलालजी जैतवार, डाॅ. खुशालजी शिवणकर, भिकुभाऊ रहांगडाले, चरणदासजी चंद्रिकापुरे, रमेश चुटेजी, मधुताई अग्रवाल, संजुभाऊ कटरे, हरिभाऊ कटरे, श्यामलालजी नैताम, देवरावजी चुटे, भिमरावजी बोहरे, हत्तीमारे, शालीनाताई टेंभुर्णीकर, किर्तीभाऊ शहारे, विजयभाऊ भोयर आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.