– २-३ दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीवरच्या अपघाती घटनेवरून मुख्याधीकाऱ्यांशी पाणीपुरवठा संदर्भात केली चर्चा
– शहरातील पाणी पुरवठा टाकींना संरक्षण भिंतीसह सर्व सुरक्षा सुरक्षात्मक उपाययोजना करीत असल्याची मुख्याधिकारी यांची माहिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा टाकीमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमध्ये मृत माणूस आढळल्याने गडचिरोली शहरात खळबळ उडाली असून यापुढे अशी दुर्घटना होऊ नये याकरिता आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्यात व गडचिरोली शहराला स्वच्छ व प्रदूषण विरहित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे संबंधित अभियंता हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मुख्याधिकारी यांनी गडचिरोली शहरात पिण्याच्या पाण्याच्या ८ टाकी असून ५ टाकींना संरक्षण भिंतीसह सर्व सुरक्षात्मक उपाययोजना आहेत. त्यातील उर्वरित ३ टाकींना संरक्षण भिंती सह सर्व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तातडीने काम सुरू केलेले आहे. या पुढे भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दखल घेतली जात असून पाण्याचा सुरक्षेकरिता टाकीजवळ रात्रपाळी माणूस लावलेले असल्याची माहिती गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिली.