भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे ओबीसींची पार पडली नियोजित संघटनात्मक बैठक

198

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे ओबीसींची नियोजित संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीमध्ये केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवा, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजना अमलांत आणले आहेत.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात ईपिरीकल डाटा गोळा न केल्याने, न्यायालयात टिकला नाही याला जबाबदार राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण गेले.असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून खा. अशोकजी नेते यांनी केले.

तसेच या बैठकीमध्ये ओबीसीचा जिल्हा मेळावा घेण्यात यावे असे ठरले. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून खा. अशोकजी नेते होते.प्रमुख अतिथी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रामरतन गोहणे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.

त्याप्रसंगी प्रशांतजी वाघरे महामंत्री, प्रमोदजी पिपरे महामंत्री, रमेशजी भुरसे किसान आघाडी प्रदेश सदस्य, सुनिल पारधी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, रमेशजी बारसागडे जिल्हाध्यक्ष किसान आघाडी, चांगदेवजी फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, दिलीप चलाख तालुकाध्यक्ष, साईनाथ बुरांडे महामंत्री, वसंताजी दोनाडकर महामंत्री वडसा, भास्कर भुरे ओबीसी जिल्हा महामंत्री, मुक्तेश्वरजी काटवे शहराध्यक्ष, अनिलजी पोहनकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, अनिल कुनघाडकर माजी न. प. उपाध्यक्ष, शेषराव कोहळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.