आधारभूत धान खरेदीचा लाभ घ्या : आमदार कृष्णाजी गजबे

117

– देऊळगाव आधारभुत भात रब्बी खरेदी केंद्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेचा लाभ शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावच्या वतीने आधारभूत भात रब्बी खरेदी केंद्र येथील खरेदी केंद्राचे उद्घाटन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी आमदार गजबे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. .
यावेळी तहसीलदार सोमनाथ माळी, माजी पंचायत समिती सदस्य तथा कुरखेडा संस्थेचे उपसभापती चांगदेव फाये, उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे सभापती अशोक मडावी, उपसभापती रौऊक शेख, सरपंच कुरेशा मडावी, रमेश बावनथडे, आविकाचे संचालक प्रकाश नारनवरे, जयदेव खुणे, धनिराम परसो, कोल्हु मडावी, पतिराम कोकोडे, रघुनाथ मडावी, भिमराव शेंडे, यशवंत ठलाल, मोहलाल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राकेश खुणे, नास्तीक पंधरे, उल्हास खुणे, खुशाल दखने, नाना नाकाडे, जयेद्र नाकाडे, व्यवस्थापक महेद्र मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य उध्दव गहाणे, आविमचे पंधरे, बंटी देवढगले व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी शेतकरी बांधवांंनी आमदार कृष्णाजी गजबे यांच्यासोबत विविध विषयांंवर चर्चा केली. यावेळी आमदार कृष्णाजी गजबे यांनी आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असल्याचे सांगुन शेतकर्‍यांना हेक्टरी मर्यादा ३४.५१ क्टिंटल करण्यासाठी विशेष पाठपुरावा केला तसेच उद्दिष्ट वाढविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी सांगितले.