महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जूून २०२२ रोजी शिवनी ता. गडचिरोली येथे प्रदेश काँग्रेस महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास दामदेवजी मंडलवार अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार, जितु पाटील मुनघाटे, हरबाजी मोरे, तालुका समन्वयक वसंतजी राऊत, उपसरपंच उषाताई गुरनुले, ता. अध्यक्ष रोजगार स्वयंरोजगार सुधिर बांबोळे, सभापती शाळा समिती घनशामजी गुरनुले, सेवा सहकारी उपाध्यक्ष निलकंठ पेंदाम, परशुरामजी गेडाम, दिलीप चौधरी, दिवाकरजी निसार, पुरुषोत्तम बांबोळे, मनेहरजी गेडाम, अनिकेत राऊत, मुख्याध्यापक मडावी हजर होते.