शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे : आमदार डॉ. देवरावजी होळी

116

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये भेंडाळा येथे महाराजस्व अभियान

– तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणारा कायदा केल्याबद्दल मानले त्यांचे आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेंडाळा येथील महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

भारतीय जनता पार्टीचा नेतृत्वातील सरकारने वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतरित करणारा अत्यंत सोपा व सुधारित कायदा अमलात आणला. त्यामुळे असंख्य वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आल्या. त्याचप्रकारे आपसी वाटणी तील खातेफोड करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सुलभ व सोपी करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास कमी झालेला आहे. यासाठी त्यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना श्रेय दिले असून त्यांचे विशेष आभार मानले आहे.
लोकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या कौटुंबिक शेतीचे खातेफोड करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी या महाराजस्व अभियानाप्रसंगी शेतकऱ्यांना केले आहे.