जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार तर कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त तहसीलदार पुष्पलताताई कुमरे यांची निवड

137

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांनी गडचिरोली जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी पोलीस विभागात सेवा देऊन निवृत्त झालेले दामोदर मंडलवार यांची नियुक्ती केली. तर कार्याध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार पुष्पलताताई कुमरे यांची निवड केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दामदेव मंडलवार आणि पुष्पलताताई कुमरे हे दोघेही सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असल्याने प्रशासन, युवक व रोजगार या विषयांंवर त्यांचा चांगला अनुभव आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या वतीने युवकांच्या रोजगारासंदर्भात अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेसचे जेष्ट नेते तथा जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॉ. प्रणित जांंभुळे, युवक काँँग्रेस जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.