नारायण जराते यांचे निधन : पुलखल येथे होणार अंत्यसंस्कार

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नजिकच्या पुलखल येथील नारायण कवळू जराते (वय ५० वर्षे) यांचे गुरुवारी, रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी येथील आस्था हास्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने जराते परिवारावर दु:खाचे सावट कोसळले आहे. पुलखल येथील वैनगंगा नदीघाटावर आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांचे ते काका होते. गावात अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेल्या नारायण जराते यांची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथील आस्था क्रीटीकल केअर हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, मुलगा महेंद्र, मुलगी अश्विनी असा आप्तपरिवार आहे.