जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भोंगा वाजवून महागाई जुमला आंदोलन

143

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामान्य जनतेला अच्छे दिनच्या खोट्या आश्वासनाचे हातावर गाजर देऊन मागील 6 वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आली. तेव्हापासून सतत गोरगरीब कष्टकऱ्यांचा रक्त पिण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या धोरणामुळेच सतत पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने “महागाई जुमला आंदोलन” करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन आहे की नहीं आये? गरिबी कम हुई की नहीं हुई? पेट्रोल डिझेल के दाम कम हुये की नहीं हुये? ह्या प्रश्नार्थक ध्वनिफीत लावून इंदिरा गांधी चौकातून शहरात रॅली काढून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, घनश्याम वाढई, जितू पाटील मुनघाटे, उपाध्यक्ष अनिल कोठारे, किसान काँग्रेस अध्यक्ष वामनराव सावसागडे, अनुसूचित जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित महिला अध्यक्ष अपर्णाताई खेवले, विद्या कांबळे, भैय्याजी मुदमवार, प्रभाकर कुबडे, नंदू कायरकर, बाळू मडावी, हरबाजी मोरे, आशिष कामडी, संजय चन्ने, रुपेश टिकले, वसंत राऊत, प्रतीक बारसिंगे, कृष्णाजी झंझाळ, घनश्याम मुरवतकर, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने, विकास देशमुख, विलास रोहनकर, बंडू भोयर, गितेश देशमुख, गजानन रोहनकर, कुंदन झाडे, भुवन कोसनकार, किरण गेडाम, संजय गोहणे, चंद्रकांत मेश्राम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.