आपल्या समस्या सोडविण्यासाठी आमसभेला आवर्जून उपस्थित राहावे : आमदार डॉ. देवरावजी होळी

88

– २८ एप्रिल रोजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली धानोरा तालुक्याची वार्षिक आमसभा

– आपल्या समस्यांचे लेखी निवेदन घेऊन आमसभेला उपस्थित राहण्याचे जनतेला आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी धानोरा तालुक्याची वार्षिक आमसभा आमदार डॉ. देवरावजी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून जनतेने आपल्या समस्यांचे लेखी निवेदन सोबत आणून या माध्यमातून आपल्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी या वार्षिक आमसभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.

या आमसभेमध्ये वनहक्क धारकांचे पट्टे, प्रपत्र ड मधून वगळण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्याचे प्रश्न , घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती, अतिक्रमण धारकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अशा विविध विषयांवर चर्चा होणार असून आपल्या समस्यांचे लेखी निवेदन आणून आपल्या समस्यांचे निराकरण या माध्यमातून करावेत, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी धानोरा तालुक्‍यातील जनतेला केले आहे.