रायगट्टा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

129

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील रायगट्टा येते भजरंग सि. सि. क्रिकेट क्लब यांच्याकडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर दूसरा पारितोषिक ग्रामपंचायतचे माजी सरपंचा श्रीमती शकुतलाताई माधव कुडमेथे व ग्रामपंचायतचे सचिव एस. एस. सडमेक यांच्याकडून तसेच तिसरा पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माझी सभापती भास्करभाऊ तलांडे होते. यावेळी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद माजी सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, अँड. एच. के. आकदर, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, रायगट्टाचे माजी सरपंचा शकुतलाताई कुडमेथे, राजारामचे माजी सरपंचा जोतीताई जुमनाके, रंगा आलाम, पेसा अध्यक्ष दीपक अर्का, मधुकर गोंगले, व्येकय्या कर्डालावार, शंकर दुर्गे, रमेश पोरतेट, सत्यनारायण बात्तूलवार, रामशंकर अंबिलीपवार, कार्तिक तोगम आदी होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन सुरेश्चंद्र जुमनाके यांनी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तिरुपती चिंतावार, उपाध्यक्ष महेश जाकेवार, सचिव संपत चिटकला, सहसचिव सुरेश आलमवार, सहसचिव श्रीसागर अंबीलपवार व गावातील नागरिक उपस्थित होते.