उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती (सायलेट डिझास्टर) आहे. वातावरणाचे तापमान 37 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असल्यास मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषुन घेऊ लागते आणि त्यांचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात व प्रसंगी मुत्यू ओढावतो.

हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट म्हणजे काय?

एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणाचे तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असणे किंवा, सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान 45 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असणे.

कोणत्या व्यक्तींना उष्णतेच्या लाटेचा त्रास अधिक होऊ शकतो ?

उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द लोक आणि लहान मुले, स्थूल लोक, जाड व घट्ट कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक,निराश्रित,घरदार नसलेले लोक या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटंसंदर्भात विशेष काळजी

उष्णतेच्या लाटेचा कोणता विपरीत परीणाम होऊ शकतेा?

किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश, हातापायाला गोळे, मळमळ, चक्कर, सौम्य ताप असे लक्षणे दिसतात. गंभिर प्रकारात उष्माद्याताचा समावेश होतो. तीव्र स्वरुपाचा ताप,छाती  दुखणे, दम लागणे असे लक्षणे दिसतात. व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करु नये ?

हे करा : पुरेसे पाणी प्या,प्रवासात पाणी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी/हॅट खाली ओलसर कपडा ठेवा. ताप आल्यास रुग्णाचे अंग थंड पाण्याने पुसणे, माथ्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवणे, काखेत आईस-पॅक ठेवणे इ.उपाय करावे. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे करु नका : शक्यतो उन्हाच्या वेळेत घरा बाहेर जाणे टाळा, कष्टाची कामे उन्हात करु नका, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे, तंग कपडे, वापरु नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा,स्वयंपाकघर हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. खूप प्रथिने युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.