नोंदणीकृत पदवीधरांच्या नाव नोंदणीची तारीख २० मे पर्यंत वाढविण्यात यावी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर यांंची मागणी

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 131 मधील तरतुदीनुसार गोंडवाना  विद्यापीठातील विविध प्राधिकरण निवडणूक 2022 साठी  पदवीधरांंकडून पदवीधर म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक 23 मार्च 2022 पासून 22 एप्रिल 2022 पर्यंत सुरू आहे. परंतु हा कालावधी अत्यंत अल्प असून बऱ्याच पदवीधराकडे पदवी प्रमाणपत्र नाहीत. ते सदर प्रमाणपत्र संबंधित कॉलेजकडून मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा विस्ताराने मोठा असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा अभावी पदवीधरांना नोंदणी करण्यासाठी वेळ लागत आहे.बऱ्याच विवाहित महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत आहे. तर बऱ्याच पदवीधरांना नोंदणी प्रक्रिया सुरू आहे हे अजूनपर्यंत माहीतच नाही. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी होण्यासाठी, नोंदणी प्रक्रिया चा कालावधी एक महिना पुढे वाढविण्याची गरज आहे. तरी ही प्रक्रिया 20 मे पर्यंत वाढवण्यात यावी तसेच ज्या विवाहित महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही त्यांना पॅन कार्डचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी गोंडवाना विद्यापीठाला केली आहे.