केंद्रिय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्या उपस्थितीत आज फंक्शन हॉल गडचिरोली येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

87

– मेळाव्याला उपस्थित राहण्याचे गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे आवाहन 

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रिय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलन बुधवार, दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता चामोर्शी रोडवरील फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे आदींची उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्याला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.