पदयात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

83

– सर्वोदय संकल्प पदयात्रेत तेलंगाना – महाराष्ट्र सीमेवरील पिंपळखुंटी येथे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भुदान निमित्त विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठाण व राजीव गांधी पंचायत राज संघटनेव्दारे तेलंगानातील पोचमपल्ली ते महाराष्ट् राज्यातील वर्धा जिल्हयात सेवाग्राम पर्यंत सर्वोदय संकल्प पदयात्रा 1 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत 600 किलोमीटर पदयात्रेचे आयोजन केलेले होते. हि पदयात्रा माजी खासदार तथा राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिनाक्षी नटराजन व राष्ट्रीय

उपाध्यक्ष माजी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काढण्यात आली या पदयात्रेचे तेलगांना महाराष्ट् सिमेवर महाष्ट्ातील पिपंळखुंटी येथे आगमन झाले. अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मा. मुकुल वासनिक, माजी मंत्री व महाराष्ट् प्रदेश काॅेग्र्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, विधान परिषदेचे सदस्य अभिजीत वंजारी, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश युवक काॅग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी हे उपस्थित होते. पदाधिका-यांचे जिल्हयातील कार्यकत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
यवतमाळ जिल्हयातील पिपंळखुंटी या गावात जाहिर सभा घेण्यात आली या सभेमध्ये बोलतांना मा. मुकुल वासनिक यांनी म्हणाले की, काॅग्रेस पक्षाच्या असंख्य स्वातंत्र्यंसेनानींनी महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरु व आध्यात्मीक गुरु विनोबाजी भावे यांच्या नेतृत्वात देशाला स्वातंत्र मिळवून दिले. स्वातंत्र्यांनंतरची भारताची आर्थिक सामाजीक परिस्थीती अतिशय भिन्न होती. भारतातील संस्थानिक व भारतातील भुमीहिन यांच्यात जमिन धारने मध्ये जमिन आसमानचा फरक होता. भारतातील असंख्य संस्थानिकांकडे हजारो एकर जमिन होती तर भारतातील लाखो लोक भुमिहीन होते. स्वातंत्र मिळाल्यानंतर भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीवर सगळया नागरिकांचा समान हक्क असावे. हि भुमिका तत्कालीन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांची होती. संस्थानीकांकडील जमिन प्रेमाने भूमिहिन नागरिकांना मिळविण्यासाठी आध्यात्मीक गुरु विनोबाजी भावे यांच्या नेतृत्वात भुदान चळवळ उभारल्या गेली. या चळवळीचा भाग म्हणून आध्यात्मीक गुरु विनोबा भावे हे 14 फेब्रुवारी 1951 ला तेलंगानातील पोचमपल्ली संस्थानीकांनी 100 एकर जमिन विनोबा भावे भुमिहीन लोकांना दान केली. काॅग्रेसचे धोरण हे सत्तेच संपत्तीच विकेद्रींकर करुन सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच धोरण होते. परंतु सद्याचे केंद्र सरकार हे सत्तेचे व संपत्तीचे केद्रींकरण करीत असल्याने तसेच वेगवेगळया परियोजनाच्या नावाखाली उदा. उद्योग, अभयारण्य यांच्या नावाखाली गोरगरीबांच्या जमिनी शासन हस्तांतरीत करुन मोठया उद्योगपतिनंा जमिनी देण्याचा सपाटा केंद्र सरकारने सुरु केलेला आहे. हे केंद्र सरकारचे धोरण देशातील राज्य व्यवस्थेला मारक असल्याने काॅग्रेसचे गोरगरीबांपर्यंत सत्ता व संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरणाचा सामान्य जनतेला प्रचार व प्रसार होण्यासाठी संपूर्ण देशात अशा प्रकारची काढणे देशातील लोकशाही व्यवस्था व स्वातंत्र संग्रामातील नेत्यांचा सैनिकांचा अपेक्षित देश स्वातंत्र देशाची उभारणी करण्यास मदत होण्यास होईल असे व्यक्तव्य मुकुल वासनिक यांनी केले.
सभेला उपस्थित अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मा. मुकुल वासनिक, माजी मंत्री व महाराष्ट् प्रदेश काॅेग्र्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, विधान परिषदेचे सदस्य अभिजीत वंजारी, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश युवक काॅग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, राष्ट्ीय सचिव काॅ. कमिटी सचिन नाईक, राजीव गांधी पंचायती राजचे उपाध्यक्ष संजय ठाकरे, माजी आमदार वामनराव कासावार, जितेंद्र मोघे, युवक काॅग्रेस महासचिव शिनुअण्णा नालामवार, माजी आमदार विजया घोटे यवतमाळ जिल्हयातील यांच्यासह अखील भारतीय काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व यवतमाळ जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.