खासदार अशोक नेते यांनी घेतले सेमाना येथील श्री हनुमानाचे दर्शन

124

– सभागृहासाठी दिला खासदार फंडातून 10 लाखाचा निधी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सेमाना येथील हनुमान मंदिरात आज 16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी भगवान श्री हनुमंताचे दर्शन घेतले व पूजा- अर्चा केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी सेमाना देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाची पाहणी केली व त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच सेमाना येथे भाविकांच्या सोयीसाठी सभागृह बांधकाम करण्यासाठी खासदार निधीतून 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घिसूलालजी काबरा, भाजपचे अनिलजी करपे, माजी भाजयुमोचे शहर अध्यक्ष हरिशजी राठी, भाजपचे रणछोड कलंत्री व अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.