शिवसेना वैद्यकीय कक्ष म्हणजे गोरगरीबांसाठी आरोग्यसेवेचे दालन !

91

– शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे प्रतिपादन

– वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गिलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गरीब व सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चालविले जात आहे. या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्हयाच्या विविध भागात आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.नेत्र चिकीत्सा शिबिरात आतापर्यंत १५ हजार चष्म्याचे वितरण करण्यात आले आहे. एखाद्या रूग्णांना मोठया शस्त्रक्रियेसाठी मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी, विविध ट्रस्टच्या माध्यामातून आर्थिक मदत मिळवू दिले जाते.तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत थेट मदत केली जाते. शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधेचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिबिराप्रसंगी केले. शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली तालुक्यातील गिलगाव येथे मोफत आरोग्य तपासणी, चष्मे वाटप व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंगेश चिवटे बोलत होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते पार पडले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तज्ञ चमूने नागरिकांची आरोग्य तपासणी केली.त्यानंतर रूग्णांना औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच दृष्टीदोष असलेल्या रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार होते. गिलगाव परिसरातील गोरगरीब नागरिकांना शिवसेनेच्या वतीने आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजवंतांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देणे हे शिवसेनेचा हेतू आहे.गडचिरोली जिल्हयातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब व जिल्हयाचे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी विशेष लक्ष दिले आहे. कोरोना काळात जिल्हावासीयांना विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो. वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष व मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने जिल्हाभरात आरोग्य शिबिर आयोजीत करून आरोग्य सेवेचे दालन उपलब्ध करून देण्यात आहे. या माध्यमातून गोगरीब रूग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळत आहे. नागरिकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. याप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, नवनाथ ऊके, संदीप भुरसे, गणेश दहलाकर, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, सूरज कोलते, अरुण बरपात्रे, राजू जवादे, प्रशांत ठाकुर, धनवान लड़के, राकेश गोड़सेलवार, धनेश्वर आवारी, राहुल पासंगे, प्रमोद आवारी, नत्थू हर्षे, शामराव वरवड़े, रंजीत हर्षे, पंकज जैस्वाल, राहुल सिडाम, सूरज पादांडे, अमन वरवड़े, चेतन सिडाम, आशीष हर्षे, रमेश आवारी, ऋषि आवारी, जयदेव मेश्राम, कवडू खेडेकर, संजय आवारी, निखिल चावर्दाने, लोकेश गिरोले, अनिल फ़फ़नवाड़े, तुषार बोरकर, हर्षल रामटेके,अजिंक्य नागरले, हर्षल रामटेके, मुखेश चौकशी, अष्पक सय्यद, गणेश भोयर यांच्यासह गिलगांव येथील शिवसैनिक व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.