धानाला बोनस नाकारणाऱ्या आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी गडचिरोलीकडून जाहीर निषेध

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्रात तीन पक्षाची आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडावर पाने पुसत आहे. दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला बोनस यावर्षी सुध्दा मिळायला पाहिजे होता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांना बोनस देणार नाही अशी घोषणा आघाडी सरकारने केलेली आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चोकात आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.
जे शेतकरी विहित मुदतीत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत संपूर्ण कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिली पाहिजे. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केली आहे.
आंदोलनाला जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, वैष्णवी नैताम, राजू शेरकी, नरेश हजारे, देवाजी लाटकर, मोरेश्वर धक्काते, जनार्धन भांडेकर, प्रशांत अलमपटलावार यांंच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.