शिवसेनेमुळे शिव मंदिराचे काम मार्गी लागणार

85

– शिव मंदिराच्या बांधकामासाठी शिवसेनेने केली मदत

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

–गड़चिरोली तालुक्यातील गिलगांव येथे सेवाभावी कार्याने शिवजयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गड़चिरोली तालुक्यातील गिलगांव येथील शिव मंदिराच्या बाधकामा साठी आर्थिक मदत देण्यात आली गिलगांव येथे लोकवर्गनीतून शिव मंदिराचे काम करण्याचा निर्णय गावातील नागरिकांनि घेतला लोक वर्गनि गोळा करून मंदिराचे बाधकाम सुरु आहे. परंतु मंदिराच्या कामासाठी निधि कमी पड़त असल्याची बाब शिवसैनिकानी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासमोर मांडली. शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सेवाभाव जोपासत शिव मंदिराच्या बाधकामासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बंधीलकी चे दर्शन घडविले. गावातील सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गिलगाव वासियानी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याबद्दल कृत्ज्ञता व्यक्त करीत समाज कार्यासाठी सदैव धावून जाणारा खरा शिवसैनिक असल्याचे गौरद्धगर काढले. गावातील नागरिक व शिवसैनिकाच्या उपस्थितित शिवसेना शाखा गिलगांव यांच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद भाऊ कात्रटवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार प्रेरणादायी आहे शिवरायांचे वेक्तिमत्व डोळ्या समोर ठेवून कार्य केल्यामुळे बळ मिळते. एक शिवसैनिक म्हणुन जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असून या भागातील विकासासाठी डिपीडीसी व अन्य माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. यानंतर मार्गदर्शन करतांना सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे म्हणाले, शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून शिवसेना निर्माण झाली आहे. शिवसेनेने नेहमीच समाज सेवेचे व्रत जोपासले आहे. कोणतीही समस्या असल्यास शिवसेना समस्या सोडविण्यासाठी पुढे येते. जनतेने सुद्धा शिवसेनेला सहकार्य करून सेवेची संधी द्यावी. आम्ही शिवसैनिक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू. असेही विलास कोडापे म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, यादवजी लोहंबरे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, संजय शेंडे, प्रशांत ठाकरे, धनंजय लड़के, राकेश गोड़सेलवार, बबन आवारी, रमेश आवारी,अमान वरखेड़े, आशीष हर्षे, पवेश नरुले, नीलेश गिरोले, अजिंक्य नागराले, राहुल पासाडे, हर्षल रामटेके, कवडू खेडेकर, संजय आवारी, नत्थू हर्षे,वामन भरणे,मुखेश चुधरी,नारायण हर्षे, जगदीश गिरोले,मिथुन कोटनगले, सचिन फावनवाड़े,विजय भरने,यासह गिलगाव येथील शेकडो माता; भगिनी , गावकरी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.