गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणीची आज बैठक

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी बैठक 26/3/2022. ला धानोरा रोडवरील महाराजा लॉन येथे आयोजित केलेली आहे. बैठकीचे एकत्रीकरण सकाळी 11 वाजता होणार आहे. बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष अपेक्षित आहेत. बैठकीमध्ये विविध राजकीय प्रस्तावासोबत संघटनात्मक बांधणी व चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची पूर्वतयारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. बैठकीला संघटन मंत्री उपेन्द्रजी कोठेवार, जिल्हा प्रभारी तथा विधान परिषद सदस्य मा. आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, जिल्हा अध्यक्ष श्री. किसन नागदेवे, खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णाची गजबे, आमदार डॉ. देवरावजी होळी. माजी मंत्री अम्ब्रिशराव महाराज आत्राम, महामंत्री संघटन रवींद्र ओल्लालवार, महामंत्री प्रशांत वाघरे महामंत्री, गोविंद सारडा, महामंत्री प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुरावजी कोहळे. उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे समारोप प्रदेश संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेवार करतील. होणाऱ्या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.