वीर बाबुराव शेडमाके यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गडचिरोली जिल्ह्याचे मोठे योगदान : महेंद्र ब्राम्हणवाडे

79

– देलोडा येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती महोत्सव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देलोडा येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद वीर बाबुराव शेडमाके गडचिरोली जिल्ह्याचे महान सुपुत्र असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा रूपाने जिल्ह्याला थोर स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास लाभला. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान, मुख्य अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, जितेंद्र मुनघाटे, भूपेश कोलते, माजी पं. स. सभापती तुलाराम, गेडाम, सरपंच संभाजी हुलके, विश्वेश्वर दरो, अरविंद फटाले, पो.पा.हुलके, ग्रा.पं.सदस्य देवराव कोडपे, मयूर गावतुरे, सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.