चामोर्शी शहरात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा विजयी जल्लोष

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विश्वगौरव, लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल चारही राज्यातील मतदार बंधूभगिनींचे मनःपूर्वक जल्लोषाने अभिनंदन करण्यासाठी आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई अधिवेशन येथून दिलेल्या सूचनेनुसार आज सकाळी 11 वाजता चामोर्शी येथील लक्ष्मीगेट चौक येथे भारतीय जनता पक्षाचे चामोर्शी शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने जल्लोषात फटाक्याच्या आतीशबाजीने भारतीय जनता पार्टीचा विजय असो या निनादने संपूर्ण शहर दणाणून टाकला.
यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जि. प. कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे , ज्येष्ठ नेते प्रभाकर गुंडावार, विजय कोमेरवार, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, नगरसेवक आशीष पिपरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, ओबीसी आघाडी नेते भास्कर बुरे, युवा नेते निरज रामानुजवार, रामचंद्र वरवाडे, लोमेष सातपुते, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, मास्टर प्रशांत पालारपवार, राकेश भैसारे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.